वंचित आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर मार्तंड माने यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून कवठेमहांकाळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार सन 2007 पासून ते 2025 पर्यंत माने यांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केले आणि त्यातून मूलही प्राप्त झाले. मात्र, विवाहाची कोणतीही पूर्तता न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.