जळगाव महानगरपालिका समोरील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठा जल्लोष करण्यात आला दरम्यान शनिवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता मंत्री गिरीश महाजन यांनी गणरायाच्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांनी ठेका घेतल्याचे दिसून आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मिरवणुकीत गणेश भक्तांसोबत जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.