आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सामुदायिक भवन, खापा (सावनेर) येथे लहु सेना, खापा आयोजित अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवात सहभागी होऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्याची संधी लाभली. नगरपरिषद खापा येथील वाचनालयाला अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्याचे तसेच मातंग समाजासाठी जागा उपलब्ध करून समाजभवन उभारण्याचे आश्वासन दिले.