दारूच्या नशेत घरासमोर अश्लील शिवीगाळ करणाऱ्या युवकाला सुनावल्यामुळे संबंधित युवकाने एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले ही घटना 25 ऑगस्ट ला रात्री नऊ वाजताच्या सुमारास तालुक्यातील उपरा गावात घडली या प्रकरणी ओपारा येथील प्रमिला मेश्राम वय 42 या जखमी महिलेच्या फिर्यादीवरून ओपारा येथील विनोद उर्फ पिंटू लांजेवार या आरोपी विरुद्ध विविध कलमानखाली लाखांदूर पोलिसांनी तारीख 26 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल केला आहे