महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान असून ती अधिक बळकट करण्यासाठी राज्यात सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायातीनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे तसेच ग्राम पंचायतीने लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी प्राप्त करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी बुधवार दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता केले आहे.ग्रामविकास विभागाकडून हे अभियान राबविण्यात येत आहे.