शेगाव येथील टावरी परिवाराने समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे कार्य घडवून आणत मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श घालून दिला आहे. येथील ज्येष्ठ नागरिक दिवंगत रामगोपाल टावरी (वय 80 वर्षे) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते यांनी 8 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दिली.ही प्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.