आज 06 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ मदत मिळावी म्हणून नदी व बंधा-याच्या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने शोध व बचाव पथक सज्ज ठेवले आहेत. त्यानुसार धुपेश्वर तालुका मलकापूर येथील पुर्णा नदीवर तहसीलदार मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक बोट व बचाव साहीत्यासह सज्ज ठेवण्यात आले आहे.हे पथक धुपेश्वर,येरळी आणि जनुना तलाव जवळ तैनात आहे.