अहिल्यानगर महापालिकेतील रेकॉर्ड रुममधील जन्म-मृत्यू व मालमत्तांच्या नोंदी असलेली कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. त्यातील काही कागदपत्रे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेल्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी प्रसिद्ध करत महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत.