राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन आज विसाव्या दिवशी पोहोचले असून, शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. नियमित सेवेत समावेश, वेतनवाढ, पदोन्नतीसह विविध सुविधा या प्रमुख मागण्यांकडे शासनाकडून अद्यापही काना डोळा केला जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.आज सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. या मोर्चादरम्यान कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निव