नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, जळगाव विमानतळावर गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अँटी-हायजॅक मॉक-ड्रिल यशस्वीरित्या पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा सराव आयोजित करण्यात आला होता. या सरावाचा मुख्य उद्देश आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर प्रतिसाद, विविध यंत्रणांमधील उत्कृष्ट समन्वय आणि सुरक्षात्मक उपाययोजना अधिक परिणामकारक करणे हा होता.