उदगीर शहरातील जळकोट रोडवर चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जळकोट रोड विद्यानगर येथे १२ सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास एक इसम चोरी करण्याच्या उद्देशाने घराच्या बाहेरून खिडकीच्या सांधीतून अंधारात थांबून तोंड लपवून डोकावून पाहत असताना मिळून आला पोलीस कॉन्स्टेबल औदुंबर नागनाथ उपासे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.