नुकत्याच दोन हल्ल्यांच्या घटना घडून गेल्यानंतर पुन्हा एकदा पंढरपूरात अल्पवयीन तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना आज रविवार, दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. प्रदर्शन मार्गावरील कालिकादेवी चौकात अज्ञात व्यक्तींनी अल्पवयीन तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.