शिवसईशा प्रोडक्शन यांच्यावतीने रविंद्र नाट्य मंदिर, येथे आज रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसंस्कार’ या भव्य काव्यदालनाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. काव्यदालनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण शिवचरित्रावर आधारित असून तब्बल १०० चित्रकाव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा इतिहास, विचारधारा आणि पराक्रम यांचे प्रभावी दर्शन घडवणारे आहे. यावेळी अनिल नलावडे उपस्थित होते.