कोहलगाव येथील तीन मुलींवरून आई-वडिलांची छत्रछाया कायमची हरपली असून पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले, तर चार महिन्यांपूर्वी आईनेही जगाचा निरोप घेतला. या दुःखद बातमीची माहिती मिळताच माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी तातडीने त्या मुलींची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला. त्या मुलींच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत, त्यांच्या सांभाळाची आणि पुनर्वसनाची व्यवस्था कशी करावी याबाबत चर्चा केली.