घाटकोपर पूर्व एन विभागातील विद्याविहार पूर्व-पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाच्या विलंबाबाबत, घाटकोपर पूर्व येथील राजावाडी परिसरात पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत होणाऱ्या अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याबाबत तसेच लक्ष्मीनगर बाग परिसरातील अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत आज शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास आमदार पराग शाह यांनी मनपा उपायुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबत मुंबई महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली.