भरविर खु येथे दुपारच्या सुमारास बिबट्याने गावातील दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यात घुसून मोठी हानी केली. बाळु काशिनाथ बांडे व समाधान काशिनाथ बांडे यांच्या घरी असलेल्या गोठ्यात बिबट्याने अचानक हल्ला चढवला. अवघ्या काही मिनिटांत ५० ते ६० शेळ्या ठार झाल्या. शेळ्या धडपडू लागल्याने गावकऱ्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता. गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढला असून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्या