सध्या गणेशोत्सव सुरू असून ईद देखील एक दिवसावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास डोंबिवलीतील टिळक नगर परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढला. रूट मार्च मधून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नका असं पोलिसांनी सांगितलं असून कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.