धुळे तालुक्यातील सावळी गाव परिसरातील पिंटू पौलाद भिल (वय ४२) या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. २ ऑगस्ट रोजी विष सेवन केल्यानंतर त्यांना धुळ्यातील सिद्धेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल २४ दिवस चाललेल्या उपचारांनंतर २६ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद असून, कारणांचा तपास सुरू आहे.