मोताळा तालुक्यातील लपाली येथे 13 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत “आमदार आपल्या गावी” अभियान भव्य उत्साहात पार पडले. ग्रामपंचायतीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन गावकऱ्यांच्या पाणीपुरवठा योजना, वीज, रस्ते, घरकुल, बचत भवन, व्यायामशाळा, अभ्यासिका, बोअरवेल्स यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आणि तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.