दत्तात्रेयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची २०२४-२५ या आर्थिक वर्षाची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दि. ४ रोजी दुपारी दोन वाजता कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.