राजुरा बाजार येथील आठवडी बाजार येथे उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे घटना उघडकीस आली या प्रकरणातील फिर्यादी शेख इरफान शेख इस्माईल हे बाजारात भाजीपाला घेण्याकरता गेले असता त्यांची मोटरसायकल होंडा कंपनीची शाईन एमएक्स मोटरसायकल क्रमांक एम एच 31ft 555 ही चोरीला गेली असून यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे यावरून दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.