आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका विशेष मोहिम राबवित आहे. यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यास लोकप्रतिनिधींची बैठक आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास महापालिका मुख्यालयात घेण्यात आली. उपायुक्त प्रसेनजित कारलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी यावेळी आयुष्यमान कार्डचे महत्व लोकप्रतिनिधींना सांगितले. तसेच यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती सांगितली.