शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता पत्रकारांना माहिती दिली की भाजी मंडई येथून मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. त्यामध्ये जगदीश रामप्रसाद महतो वय ३२, अजितकुमार सुरेश मंडल वय २४, रोहितकुमार सियाराम महतो वय२५, तिधे रा. महाराजपूर, झारखंड, अर्जुन राजेश मंडल वय २०, रा. बसाकोला, रा. झारखंड, शोयेब मस्तानसाब शेख वय २४, रा. सलगरापूर, ता. मुखेड, जि. नांदेड आणि एक विधीसंघर्ष यांना अटक केली.