आंदोलनात सहभागी मराठा आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात दुर्दैवी घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील विजय घोगरे या तरुण आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आंदोलनात सक्रिय सहभाग घेत असताना अचानक घोगरे यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.