कन्नड तालुक्यात दोन चिंताजनक घटना घडल्या आहेत. रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निपाणी येथील ८ वर्षीय प्राचंल प्रकाश कदम नावाची मुलगी शेतातील नाल्यातून वाहून गेली. सोमवारी (ता. २९) दुपारी पिशोर येथील चौथीत शिकणारा १० वर्षीय श्रावन निवृत्ति मोकासे आमराई रस्त्यालगत पुलावरून तोल जाऊन पाण्यात वाहून गेला. रविवारी रात्री उशिरापर्यंत या दोन्ही मुलांचा अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध लागला नव्हता.