निवडणुकीत दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने माजी मंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबरला नेर शहरातील निर्मल बंसी लॉन येथे कर्जमुक्ती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या न्याय हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे.असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.