शिर्डी शहरांमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेचा औपचारिक शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. पार्किंगमुळे भाविकांची मोठी सोय होणार असून या ठिकाणाहून मंदिरामध्ये जाण्यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीने साईभक्तांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.