खेड तालुक्यातील भोसते अलसुरे सीमेवरील भोसते गावाच्या हद्दीत गणेश विसर्जनासाठी जगबुडी नदीत बुडालेल्या मंगेश पाटील यांचा अखेर २२ तासाच्या शोधा नंतर मृतदेह सापडला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली होती. दोन युवक नदीच्या प्रखर प्रवाहात अडकले होते. त्यापैकी एकाने कसा बसा पोहत किनारा गाठत जीव वाचवला. मात्र भोसते पाटील वाडी येथील ४० वर्षीय मंगेश पाटील यांचा मृत्यू झाला.