मुखेड तालुक्यातील ताईबाई तांडा येथे लक्ष्मीकांत चव्हान यांच्या शेळ्यावर विज पडल्याने २ शेळ्या दगावल्या आहेत तसेच मौजे चांडोळा येथील मधुकर भारत पाटील यांची १ म्हैस वीज पडून मयत झाली आहे त्याचबरोबर मौजे आखरगा येथे माधव गणपती गंगनर यांच्या बैलावर विज कोसल्यामुळे १ बैल मरण पावल्याची घटना दि. २२ एप्रील रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे.अवकाळी पावसात विज पडून नुकसान झालेल्या तिन्ही ठिकाणच्या घटनास्थळांचा त्या गावच्या तलाठी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन अहवाल तहसिल कार्यालयात दाखल केला आहे.