सिंदखेडराजा येथील रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी देऊळगाव राजा येथे शिक्षण घेत असून दररोज सिंदखेड राजा ते देऊळगाव राजा जाणे-येणे करते. २६ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी वडिलांसोबत दुचाकीवर बसून घराकडे जात असतांना शेख सोहेल शेख हारून याने पिंपळनेर शिवारात सदर दुचाकी अडविली. मुलीची बॅग हिसकावून तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने सोबत चालण्यासाठी धमकी देत विनयभंग केला.याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शेख सोहेल विरुद्ध देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.