कंटेनरचा धक्का लागून दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेले. ही घटना आंबेठाण चौक चाकण सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. प्रसाद संजय जोंधळे (वय ३२, रा. आंबेठाण चौक, दावड मळा, चाकण, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.