छत्रपती संभाजीनगर: घरातून किराणा सामान आणायसाठी निघालेल्या १३ वर्षीय मुलाला गुन्हेगाराने रस्त्यात अडवलं. पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात चाकूचा धाक दाखवून नैसर्गिक अत्याचार केला. ही घटना रविवारी रात्री दहा वाजता जिन्सी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.