करमाळा तालुक्यातील देवीचा माळ येथील पत्नीला पतीने सिपला कंपनीत इंजिनियर आहे. १५ लाख रुपये पगार आहे, असे म्हणून लग्न केलं. पहिलं लग्न झालेलं असताना घटस्फोटाची माहिती न देता विश्वासघात केला. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करत घराबाहेर काढलं. याप्रकरणी राधिका मोरे यांनी या घटनेची नोंद करमाळा पोलिसात केली असून पोलिसांनी फसवणूक करणारा पती निखिल मोरे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.