रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ठेकदाराच्या वतीने अन्न गरम ठेवण्यासाठी अनधिकृत पणे पार्किंग परिसरात किचन शेड उभारण्यात आले आहे. या शेड साठी पालिका प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.