जालना जिल्ह्यातील महसुल मंडळस्तरावरील काही गावात जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी प्रत्यक्ष जावून तक्रारी सोडविण्याचे निर्देश आहेत. विविध कामाबाबत परस्परावरती केवळ टीका करुन उपयोग नसून संवादातून मार्ग काढायचा आहे. ग्रामस्थांची शासनामधील प्रलंबित विविध कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील,असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी केले. बुधवार दि.26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता जालना तालुक्यातील नेर गावात वटेश्वर भगवान मंदिर सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.