बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती.रक्षाताई खडसे, कामगार मंत्री आकाश फुंडकर,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, कर्मचारी वर्ग तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.