महावितरण कंपनीत कार्यरत असलेल्या तांत्रिक कामगारांच्या पगारातून जळगाव जिल्हा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेने परस्पर अवैध रक्कम कपात केल्याच्या विरोधात कामगारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धाव घेऊन लेखी निवेदन सादर केले.