पुसद तालुक्यातील पूस धरण येथे दिनांक 18 ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना घडली होती. पुसद तालुक्यातील गाजीपुर येथील आदिनाथ मुळे हा तरुण धरण प्रकल्प येथे गेला असता तो पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. अखेर दिनांक 21 ऑगस्ट रोजी अंदाजे सायंकाळी 5 वाजता अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाला भोजला येथे त्याचा मृतदेह आढळला आहे.