1853 साली भारताची पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे अशी धावली आणि प्रवासाचा नवा इतिहास लिहिला गेला. तब्बल 172 वर्षांनंतर आता ठाणे स्थानकाने पुन्हा एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्थानकाची धुरा प्रथमच एका महिलेच्या हाती आली असून अपर्णा देवधर-ब्राह्मणे ठाण्याच्या पहिल्या महिला स्टेशन मास्तर म्हणून नियुक्त झाल्या आहेत. या संदर्भात आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास माहिती मिळाली आहे.