सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साही, मंगलमय वातावरणात बुधवारी सकाळी 11 वाजता आगमन झाले. जिल्हाधिकारी यांनी आपल्या निवासस्थानी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्निक गणपतीची आरती करून दर्शन घेतले. सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना, नागरिकांना, गणेशोत्सव मंडळांना श्री गणेश उत्सवाच्या यावेळी शुभेच्छा देताना डॉल्बीमुक्त आणि पारंपरिक वाद्य सोबत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केल.