उरमोडी धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक 01 सप्टेंबर 2025, रात्री 9.00 वाजता जलविद्युत प्रकल्पातून उरमोडी नदीमध्ये 300 क्युसेक विसर्ग सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे उरमोडी नदी पाणीपातळीत वाढ होणार आहे. नदी काठावरील गावामधील ग्रामस्थ , ग्राम प्रशासन, संबंधित यंत्रणा यांनी याची नोंद घ्यावी. गणपती विसर्जन करीता नदीपात्रात जाणाऱ्या सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.