सुलतानपुर येथे २२ ऑगस्ट रोजी रात्री एलसीबीच्या पथकाने काळ्या बाजारात विकल्या जाणारे ११५ घरगुती वापराचे भारत गॅस कंपनीचे आणि एचपी कंपनीचे ५६ गॅस सिलेंडर असे एकूण १७१ सिलेंडर ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मेहकर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुलिन अंबुलकर यांच्या आदेशानुसार एएसआय राजकुमार राजपूत आदींनी केली आहे.