वाशिम नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरातील स्वच्छता विभागाचे विविध काम वेगवेगळे खासगी व्यक्ती करीत असतात . यापैकी एका ठेकेदाराने दिनांक 24 ऑगस्ट रोजी सुमारास वाशीम ते अकोला हायवे वरील हॉटेल इव्हेंटो ते चव्हाण हॉस्पिटल दरम्यान असलेल्या रिकाम्या जागेत नागरिकाच्या घरातील संडासच्या सेफ्टी टॅंक मधील उपसलेली घाण आणून सोडली. सदर घाण त्या सेफ्टी टॅंक मधील दहा ते पंधरा वर्षाची असते. ह्या घाणीची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित टँकर मालकाची असते.