कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव–जांभूळखेडा–कोरची टी पॉइंट मार्गाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असुन रस्त्ता दलदलीचा, चिखलमय व खड्डेमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनधारकांची दमछाक तर होतच आहे, शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्यात अडचणी निर्माण होतं आहे.