माढा उपविभागीय अधिकारी अंजली कृष्णा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेली उद्धटपणाची वागणूक अशोभनीय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले आहे. आज शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलतानाचा अंजली कृष्णा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.