समुद्रपूर:ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतीपाऊसाने, अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व पिकांचे तसेच चारकोल राॅट व येलो मोझक रोगाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अती पाऊसाने तूर पिक सुकत आहे तर कपाशीचे पिक पिवळे पडले असून वाढ थांबलेली आहे. त्यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटनेने तहसिल कार्यालयावर धडक दिली व मागण्यांचे निवेदन तहसिल कपिल हाटकर यांना दिले आहे.