भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान गोसेखुर्द प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. यापूर्वी त्यांनी जनता दरबारात उपस्थित राहून जनतेच्या समस्या ऐकल्या. या भेटीदरम्यान प्रकल्पाची सद्यस्थिती, कामकाज आणि प्रगती याची माहिती कार्यकारी अभियंता राजेश ढुमने यांनी पालकमंत्र्यांना दिली. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी प्रकल्पाविषयी अधिक माहिती घेतली. धरण परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.