गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे आज, २२ ऑगस्ट रोजी, शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा सण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांना सन्मानित करण्याचा दिवस असतो. परंपरेचा अनोखा संगम या दिवशी शेतकरी आपल्या 'बैलमित्रांना' आकर्षक पद्धतीने सजवून मिरवणुकीने गावातील हनुमान मंदिरात घेऊन आले.