व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल कराल तर गाठ माझ्याशी – आमदार अमोल खताळ अहिल्यानगर – शहरातील काही विघातक प्रवृत्तींकडून व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार समोर येत असल्याने व्यापाऱ्यांत तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज दुपारी बारा वाजता आमदार अमोल खताळ यांना निवेदन देण्यात आले.