महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर जारी केलेल्या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा-कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक आहे. सदरचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिंदखेड राजा तथा ओबीसी बांधवांनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता निषेध करुन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.